अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा, तहसीलदार रामजी राठोड

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा, तहसीलदार रामजी राठोड
सुरगाणा तालुक्यात माहे सप्टेंबर २०२५ व त्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत बाधित शेतकरी/लाभार्थी यांची ई-केवायसी प्रलंबित असून, संबंधित गावनिहाय प्रलंबित लाभार्थ्यांची एक्सेल फाईल उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या एक्सेल फाईलमधील सर्व शेतकरी/लाभार्थ्यांनी आजच आपल्या नजीकच्या महा-ई सेवा केंद्रावर जाऊन तात्काळ ई-केवायसी पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शासकीय मदतीच्या प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे.
सदर सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत सहा. कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी समन्वय साधून संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
ही कारवाई मा. तहसीलदार, सुरगाणा यांच्या निर्देशानुसार करण्यात येत असून, सर्व बाधित शेतकऱ्यांनी विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



