
“माझी शाळा माझा अभिमान” हा उपक्रम शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यातील भावनिक नातं दृढ करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा सतखांब, ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मा. सौ. मंजुळताई तुळशीराम गावित (आमदार, साक्री विधानसभा) यांच्या पती डॉ. तुळशीराम गावित यांनी “माझी शाळा माझा अभिमान” उपक्रमांतर्गत शाळेस ₹२१०० चे योगदान दिले. त्यांच्या या सहकार्याबद्दल शाळा परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन करण्यात आले.शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे असे सहकार्य प्रेरणादायी ठरत असून, या उपक्रमामुळे शाळांच्या प्रगतीला निश्चितच गती मिळणार आहे.



