# पैशाच्या महापुरात झालेली चूक पुन्हा होणार नाही,* *मतदारांची पसंती खोट्या आश्वासानांच्या विरोधात. – आवाज जनतेचा
आपला जिल्हाराजकीय

पैशाच्या महापुरात झालेली चूक पुन्हा होणार नाही,* *मतदारांची पसंती खोट्या आश्वासानांच्या विरोधात.

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे वाहतांनाच निवडणूकीच्या कार्यक्रमाची अखेर घोषणा झाली. आणि सर्वत्र इच्छुक उमेदवार, मतदार राजा आणि कार्यकर्ते चौकाचौकात चर्च्याच्या रंगीन मैफीली रंगवत बसले आहेत.
कोण उमेदवार, कोण निवडणार कोण पराभूत होणार,कोणत्या पक्षाची सत्ता येणार याची गणितं जुळवतांना मतदार नागरिक दिसत आहेत.
खरे तर गेली सहा वर्ष मतदार संघात एका अगळ्या वेगळ्या राजकारणाची दिशा बघायला मिळत आहे, पदासाठी संबंध मतदार संघात पैशाच्या पावसाविषयीं चर्चा होत आहे. नागरिक या विषयावर भरभरून चर्चा करतांना दिसत आहेत, एका मताला किती पैसे, एका गावाला किती पैसे, गावातील प्रमुखाला किती पैसे, पिणाऱ्याला किती पैसे, बहिणींना भावांना युवकांना किती पैसे अशा चर्च्यांनी गावोगावी हल्ली उधाण आले आहे…. तर
काही नागरीक गेल्या निवडणूक काळात गावोगावी दिलेल्या भल्या भल्या आश्वासाणांच्या चर्चा करत आहेत, कोणी म्हणत होता,….. तालुक्याचा कायापालट करणार, पाणीच पाणी करणार, हिरवेगार करणार, स्थलांनंतर थांबवणार, रस्ते चकाचक करणार, दवाखाने उभे करणार, वीज कायमची करणार, युवकांना रोजगार आणि नोकऱ्या देणार, अशा आश्वास्नांची चर्चा आज सर्वत्र नागरिक आणि युवकांमध्ये रंगत आहे.
गल्ली बोळात आज चर्चेचा विषय बनत चाललाय तो म्हणजे म्हणजे *ऑनलाईन उदघाटणे आणि टक्केवारीचा महापूर…?* …. मतदार संघातील जनतेला वाटले की ऑनलाईन उदघाटणे म्हणजे काम सुरु झालेच……!, विकास आणि प्रगतीची फळे चाखायला मिळालीच….. पण….. घडले आणि अनुभवले ते नवीनच….
मोठ्या दिमाखात ऑनलाईन उदघाट्न करून कागदावर लिहिलेली कामे ही कागदावरच राहिली, *2200 कोटी रुपये कोणत्या वादळात कोणत्या दिशेला गेले त्याचा ठाव ठिकाणा अजूनही जनतेला लागला नाही,* उदघाट्न पाट्या लागल्या त्या जीर्ण झाल्या, थोडेफार काही करण्याचा प्रयत्न केला….तेही मटेरियल टक्केवारीच्या विळख्यात गिरणा नार पार या मुख्य नद्यासह इतर छोट्या मोठ्या नद्यांना वाहून गेले.
*आणि मतदार संघात शिल्लक राहिले ते खड्ड्याचे, आणि खोट्या आश्वासानांचे साम्राज्य…..!!* गाव, पाडा आणि खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र खड्डेच खड्डे, *शेतीची जीवघेणे नुकसान, शेतकरी आत्महत्या,शिक्षणाचा बट्ट्याबोळ, युवकांच्या नोकऱ्या बंद, आरोग्य व्यवस्था म्हणजे मृत्यूचे सापळे, पुरुष महिलांचे प्रवास करतांनाचे शेकडो मृत्यू, गर्भवती महिला आणि बालकांचे मृत्यू, विजेचा लपंडाव, कार्यालयात अधिकारी पदाधिकाऱ्यांची मनमानी, कल्याणकारी सरकारी योजणांचा ऱ्हास, महिलांची असुरक्षितता, रोजगाराच्या नावाने बोंबाबोंब, आजचा शिक्षित युवक नोकरीं मागण्यासाठी शासन दरबारीं रस्त्यावर आणि निवडलेले लोकं न्याय देन्याएवजी आश्वासन द्यायला आराम खुर्चीवर…..*
मतदार जनता विचारते भाऊ, दादा, साहेब,ताई,माई, अक्का, *कुठे नेऊन ठेवला हा मतदार संघ माझा….?*
……. रोजी रोटी वर घात घालून पर्यावरण वाचवणारे नेते आता जन्माला आले हेही विपरीतच घडले आहे…… आदिवासिंची हक्काची फ़ॉरेस्ट जमीन मोठ्या संघर्ष आणि हजारोंच्या बलिदानाने पदरात पडली आहे, त्यावर गोर गरीब पोट भरतो, उदर निर्वाह करतो, त्या पोटावरही पत्र लिहून लाथ मारता काय….? पोटावर लात मारून पर्यावरण वाचवणार का?
फ़ॉरेस्ट प्लॉट विरोधी कट कारस्थान रचनाऱ्यांनी आता मात्र फ़ॉरेस्ट प्लॉट मिळवून देतो, प्रमाणपत्र देतो, दहा एकर जमीन देतो अशी भाषा बोलणे योग्य आहे का? केंद्राने वन कायदा करूनही
2006ते 2025 या काळात गोर गरीब आदिवासीना जमीन न देण्यासाठी ढोंग करणारे शासन आणि प्रतिनिधी कोमात होते का? गेल्या दोन वर्षपूर्वी फ़ॉरेस्ट प्लॉट वाल्या बांधवांचा फ़ॉरेस्ट प्लॉट मिळू नये यासाठी शासनाला पत्र देणारी व्यक्ती आणि त्यांचे होयबा असलेले चमचे आता प्रमाणपत्र द्यायची भाषा करतात.. ह्या ढोंगी लोकांना आज मतदार संघातील जनता प्रश्न विचारते… पोटावर लाथा मारणारे गोर गरिबांना न्याय कसा देणार…?…… . *आम्हीं गरिबांनी सातत्याने अन्याय अत्याचारविरुद्ध लढणाऱ्या झेंड्याचा आधार घेऊन फ़ॉरेस्ट प्लॉट कसतोय, गरिबांना दहा एकर जमीन मिळवून द्यायला उन्हात तान्हात रस्त्यावर संघर्ष केला आहे, त्याचे हे फळं आहे.. हे प्लॉट विरोधी लोकं पत्र देऊन, भेट घेऊन, फोटो काढून, मतासाठी बोलून आणि जनतेला खोटे बोलून….. फ़ॉरेस्ट प्लॉट मिळणार नाही, हे कितीही भुलथापा दिल्या तरी फ़ॉरेस्ट प्लॉट कसणाऱ्या जनतेलाचं माहिती आहे.*
जनता आता खोट्या आश्वासनांना आणि पैशाच्या भिकेला गहाण राहनार नाही….
येणाऱ्या निवडणुकीत जनता उघड्या डोळ्याने मतदान करणार, त्यात…. सत्य विचाराने,काम करणाऱ्या , सुख दुःखात सहभागी होणाऱ्या, गोर गरीब दुःखी कष्टी लोकांना सांभाळणाऱ्या, आयुष्याची शिदोरी मिळवून देणाऱ्या, अन्याय अत्याचाराशी झुंज देणाऱ्या , हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि कोणताही जात पात धर्म असा भेदभाव न करता समाजातील सर्व जनतेला बरोबर घेऊन जाणाऱ्या पक्षाला आणि उमेदवारलाच मतदान करणार हेच सत्य आहे….
*भूतकाळातील परिस्थिती*….., *वर्तमान काळातील कामे*…… आणि *भविष्याची योग्य दिशा* कशी असावी हे निवडण्याची ही एकमेव संधी……म्हणजे..
जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणूक….2025……

हक्क….. संपतात
अधिकार…. नष्ट होतात
वेळ…… निघून जाते
निवडलेले…..भेटत नाही
उरतो फक्त…. पच्छाताप
…………………………

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!