# सुरगाणा नगर पंचायतमध्ये प्रथमच शववाहिनी गाडी – नगराध्यक्ष भरत वाघमारे यांचे उल्लेखनीय योगदान! – आवाज जनतेचा
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

सुरगाणा नगर पंचायतमध्ये प्रथमच शववाहिनी गाडी – नगराध्यक्ष भरत वाघमारे यांचे उल्लेखनीय योगदान!

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

आदिवासी भागातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी ओळखून सुरगाणा नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष भरत वाघमारे यांनी सातत्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी पाठपुरावा करून सुरगाणा शहरात प्रथमच शववाहिनी गाडी उपलब्ध करून दिली आहे.

याआधीही नगराध्यक्ष वाघमारे यांनी नगर पंचायतीसाठी अनेक लोकहितार्थ सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये –

  • अग्निशमन गाडी
  • मोटरसायकल अग्निशमन (मोबाईल सेवा)
  • माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अॅम्बुलन्स सेवा
  • जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
    अशा उपक्रमांचा समावेश आहे.

शववाहिनी गाडीच्या उद्घाटनप्रसंगी सपकाळ साहेब, नगरसेवक सचिन आहेर, भगवान आहेर, अर्जुन शिंदे, युवराज जाधव, गंगाराम चाफळकर, लाला बारुड, विजय गोयल, अजित शेख, काॅ. संजय पवार तसेच इतर मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

नगराध्यक्ष भरत वाघमारे यांची निर्णयक्षमता, कार्यपद्धती आणि जनसेवेसाठीची तळमळ यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर निर्माण झाला आहे.गोरगरिबांची साथ हीच खरी सेवा” – हे ब्रीद त्यांच्या प्रत्येक कार्यातून प्रत्यक्षात उतरलेले दिसते.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!