आदिवासी विकास विभाग क्रीडा स्पर्धच्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी आश्रमशाळा सज्ज….* *या स्पर्धेत आदर्श समता शिक्षण संस्थेचे खेळाडू निर्णायक ठरणार…..* – आवाज जनतेचा
दिनांक 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरु झालेल्या महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या मैदानी व सांघिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली आहे, यात आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पांमधील विविध तालुक्याच्या तालुकास्तरीय स्पर्धेत अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळेतील मुलामुलींचे संघ सहभागी होणार आहेत.
तालुका, प्रकल्प, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंमधे मोठी चुरस लागणार आहे. आपल्या आश्रमशाळेला तालुक्याला प्रकल्पाला आणि विभागाला चॅम्पियन ट्रॉफी मिळावी यासाठी हे धुरंधर लढणार आहेत, यासाठी विभागीय आयुक्त, प्रकल्प अधिकारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धेसाठी सहभागी खेळाडू आणि त्यांना मैदानावर कसून सराव घेणारे, खेळाडू घडवीणारे, डावपेच आखणारे मेहनती क्रीडा क्षिक्षक यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.
या क्रीडा स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील खेळाडू विध्यार्थी सहभागी होणार असून, यात खोखो कबड्डी हॅन्डबॉल, हॉलीबॉल, रिले, थाळी गोळा भाळा लांब उडी उंच उडी हार्डल्स रनिंग वॉकिंग यासारख्या खेळाची कसरत लागणार आहे,
या स्पर्धेत गुणदान पद्धती वापरली जात असून, जास्तीत जास्त संघ व वयक्तिक ईव्ह्हेंट प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय असे विजय मिळतात, त्यावर आधारित गुण मिळविणाराl प्रकल्प आणि विभाग चॅम्पियन ट्रॉफीचा प्रथम दावेदार बनतो.
सालाबाधाप्रमाणे यावर्षीही आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगगुण तालुका सुरगाणा या संस्थेतील पाच अनुदानित आश्रमशाळांनी, महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धेत विभाग आणि राज्याचे नेतृत्व करणारे संघ आणि विजेते खेळाडू खेळाडू प्रकल्प स्तरीय स्पर्धेत प्रभाव पाडतील हे निश्चित आहे
संस्थेच्या अनुदानितआश्रम शाळा आणि कळवण सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेचे खेळाडू येणाऱ्या क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेले संघ आणि प्रभावी आणि आक्रमक खेळ कळवण प्रकल्पाचे, आश्रमशाळेचे आणि शिक्षण संस्थेचे नाव उंचावतील म्हणून या सहभागी खेळाडूंना प्रकल्पाचे पदाधिकारी, आश्रमशाळेचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ प्राचार्य, मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.