बोरगाव येथील ओम साई पदयात्रा मित्रमंडळातर्फे बोरगाव ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा बोरगावमधून गुरुवारी रवाना झाली. 150 किलोमीटर चालत जाऊन 16 नोव्हेंबरला साईबाबांच्या भेटीला शिर्डी येथे पोहोचणार आहे.
या पदयात्रेत 150 तरुणांनी सहभाग घेतला आहे. पदयात्रे अगोदर बिरसा मुंडा चौकात साईंची मिरवणूक काढण्यात आली. यात बोरगाव परिसरातील साईभक्त सहभागी झाले होते. बोरगाव येथील मारुती मंदिराजवळ आरतीनंतर दिंडी बोरगाव-वणीरोडने शिर्डीकडे रवाना झाली.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.