सालभोये (ता. सुरगाणा) – शासकीय आश्रम शाळा, सालभोये येथे जननायक वीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष भारत फुला भोये, तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व वर्ग-४ कर्मचारी बांधवांनी गावात प्रभातफेरी काढत बिरसा मुंडा अमर रहे अशा घोषणांनी गावभर जागृती निर्माण केली. डीजेच्या तालावर घेतलेल्या प्रभातफेरीमुळे शाळा व गाव परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी. एम. कोल्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. डी. भोये यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. एच. बागुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.