सुरगाणा (ता. सुरगाणा) – तालुकास्तरीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धांत नुकत्याच झालेल्या कथाकथन स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नूतन विद्यामंदिर सुरगाणा येथील उपशिक्षक श्री. किशोर लोखंडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट यशाची नोंद केली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली असून पुढील स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था, नूतन विद्यामंदिरचे प्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.शिक्षक म्हणून त्यांच्या कलात्मक गुणवत्तेचा आणि प्रभावी कथाकथन शैलीचा यशस्वी प्रत्यय या स्पर्धेत आला असून पुढील पातळीवरही ते असाच उत्तम प्रदर्शन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.