विशेष वृतान्त
हरणटेकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नशा मुक्त भारत अभियानानिमित्त सामूहिक शपथ
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

हरणटेकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नशा मुक्त भारत अभियानानिमित्त सामूहिक शपथ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणटेकडी येथे नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदवण्यात आला. या मोहिमेअंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून सामूहिक व्यसनमुक्ती शपथ देण्यात आली.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुसुम चौधरी, शिक्षक कमलाकर गावित, सुभान महाले, अशोक आहेर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी हर्षदा बागुल, तसेच अंगणवाडी सेविका व शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नशेमुक्त भारत घडवण्याच्या हेतूने दिलेल्या या शपथविधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनापासून दूर राहण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान राहिले.



