मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बोरचोंड येथे महिलांची हिमोग्लोबीन तपासणी; श्रमदानातून वनराई बंधारा उभारणी
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बोरचोंड येथे महिलांची हिमोग्लोबीन तपासणी; श्रमदानातून वनराई बंधारा उभारणी
राशा ग्रामपंचायत हद्दीतील बोरचोंड येथे दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिलांची हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास सरपंच सिताराम हरी भोये, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर वाघेरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरठाण येथील वैद्यकीय पथकाची उपस्थिती होती.
स्थानिक आरोग्य कर्मचार्यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून बोरचोंड येथील एकूण 102 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
यावेळी गावातील महिलांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करून “पाणी आडवा – पाणी जिरवा” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले. पाणी संवर्धनाबाबत गावकऱ्यांच्या एकजुटीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.या पुढेही असेच उपयुक्त व विकासाभिमुख उपक्रम गावात राबविण्यात येतील, असे ग्रामपंचायत सदस्य सौ. संगिता कृष्णा गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बोरचोंड येथे महिलांची हिमोग्लोबीन तपासणी; श्रमदानातून वनराई बंधारा उभारणी