# वाघनखी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी निर्मिती – आवाज जनतेचा
आपला जिल्हाकृषी

वाघनखी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी निर्मिती

जलसंवर्धनासाठी कृषी विभागाचा उपक्रम; २५ हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वाघनखी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी निर्मिती

जलसंवर्धनासाठी कृषी विभागाचा उपक्रम; २५ हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

सुरगाणा तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे व बाऱ्हे मंडळ कृषी अधिकारी सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघनखी येथे लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमात २५ पेक्षा अधिक शेतकरी बांधवांसह बाऱ्हे मंडळातील सहाय्यक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी यांनी एकत्र येत वनराई बंधाऱ्याची यशस्वी निर्मिती केली.

या श्रमदान उपक्रमात मंडळ कृषी अधिकारी, बाऱ्हे यांच्यासह सहाय्यक कृषी अधिकारी रामदास पाडवी, दिलीप चौरे, सुरेश वाघ, चंद्रकांत गावित, मनोज बागुल, सुनील भोये, पंडीत चौधरी, योगीराज धामोडे, आनंदा गावंडे, श्रीम. कोमल गावित तसेच उप कृषी अधिकारी पंकज माळी व संजय बहिरम सक्रियपणे सहभागी झाले.

जलसंधारणासाठी शून्य खर्चाचा प्रभावी उपक्रम

कृषी विभागाच्या “पाणी अडवा – पाणी जिरवा” या संकल्पनेतून हाती घेतलेल्या या उपक्रमात माती, दगड आणि प्लास्टिकच्या रिकाम्या गोण्या यांचा वापर करून शून्य खर्चात बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी शेतात आणि ओढ्यात अडवले जाईल, ज्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात सिंचनाखालील क्षेत्र वाढून रब्बी हंगामातील पिकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.

बाऱ्हे पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये पुढील पंधरवड्यात अशाच प्रकारे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; महिलांचा उल्लेखनीय हातभार

सकाळपासूनच परिसरातील शेतकरी बांधवांनी उत्साहाने श्रमदानात भाग घेतला. या उपक्रमाचे केवळ शासकीय काम न राहता, ते एका सामाजिक चळवळीचे रूपांतर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिला शेतकरीही या कामात सहभागी झाल्या होत्या.
गावातील पंडित धूम, योगीराज धूम, देविदास गावित, रमेश मालघरे, यशवंत पालवी, नारायण देशमुख तसेच सरपंच सौ. वैशाली गावित यांचे विशेष सहकार्य लाभले. सहाय्यक कृषी अधिकारी योगीराज धामोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद

स्थानिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी केली. वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे आगामी काळात सिंचनाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!