लहानघोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगोत्सव स्पर्धा;
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

लहानघोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगोत्सव स्पर्धा;
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा 2025 उत्साहात पार पडली. रंगोत्सव मुंबई यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत चित्रकला, कोलाज, रंगभरण अशा विविध प्रकारच्या उपक्रमांचा समावेश होता. लहानघोडी शाळेतील तब्बल ४० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी अश्विनी दिनेश गायकवाड हिने आर्ट मेरिट अवॉर्ड प्राप्त करून शाळेचा गौरव वाढवला. तसेच शाळेला मिळाले—
गोल्ड मेडल – ७
सिल्वर मेडल – ५
ब्रॉन्झ मेडल – ४
सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यातील विशेष उल्लेख म्हणजे या स्पर्धेतून लहानघोडी शाळेतील तब्बल १७ विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशनसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये—
वेदिका गायकवाड, प्रतिष्ठा चौधरी, जागृती गांगुर्डे, ऋत्विक पाडवी, कृष्णली धुम, ज्ञानेश्वरी धुम, रोशन गायकवाड, दिप पवार, रुचिता पवार, पायल गायकवाड, निर्जला मोरे, मोहित भोये, श्रेया कुवर, मालती वार्डे, गायत्री पवार आणि धर्मराज गावंडे — यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भागवत पवार उपस्थित होते. सरपंच हेमलता भुसारे, वनिता भोये, मनोहर गायकवाड, नामदेव भोये, कमल कामडी, वैशाली पालवा तसेच गावातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप देशमुख यांनी स्पर्धेचे महत्व स्पष्ट केले, तर श्री. मधुकर राऊत यांनी आभारप्रदर्शन केले.



