आपला जिल्हासामाजिक
साजोळे ग्रामपंचायतीत जागतिक दिव्यांग दिन साजरा दिव्यांग लाभार्थ्यांचा सत्कार व आर्थिक सहाय्य वितरण
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

साजोळे ग्रामपंचायतीत जागतिक दिव्यांग दिन साजरा
दिव्यांग लाभार्थ्यांचा सत्कार व आर्थिक सहाय्य वितरण
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त साजोळे ग्रामपंचायतीत दिव्यांग बांधवांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवलेल्या ५% निधीतून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले.
कार्यक्रमात ग्रामसेवक वैशाली देवरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते. लाभार्थ्यांना आर्थिक मदतीसह प्रोत्साहनपर संदेश देत त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी गावपातळीवर पुढीलही उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणाचा आणि त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा ग्रामपंचायतीचा हेतू अधोरेखित झाला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.



