ज्ञानयात्री – नाशिक दर्शन शैक्षणिक सहल : विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी ज्ञानप्रवास जि.प. प्रा. शाळा पाहुचीबारी, ता. पेठ
ठाणगाव प्रतिनिधी नामदेव पाडवी

ज्ञानयात्री – नाशिक दर्शन शैक्षणिक सहल : विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी ज्ञानप्रवास
जि.प. प्रा. शाळा पाहुचीबारी, ता. पेठ
जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “ज्ञानयात्री – नाशिक दर्शन शैक्षणिक सहल 2025” उपक्रमाचा लाभ जि.प. प्रा. शाळा पाहुचीबारी (ता. पेठ) येथील विद्यार्थ्यांना 5 डिसेंबर रोजी मिळाला. सहलीत विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण तारांगण, जिल्हा परिषद नाशिक कार्यालय, फाळके स्मारक, बौद्ध विहार, पांडव लेणी, जैन मंदिर, नाणे संग्रहालय, अंजनेरी परिसर तसेच सिटी सेंटर मॉल अशा ठिकाणांना भेट देत इतिहास, विज्ञान, संस्कृती आणि निसर्गाचा अभ्यास केला.
सहलीतील सुवर्णक्षण म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांची विद्यार्थ्यांशी झालेली प्रेरणादायी भेट. विद्यार्थ्यांच्या कला, आत्मविश्वास आणि संवादकौशल्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
या सहलीसाठी सहकार्य केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. मौळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. निलेश पाटोळे, केंद्रप्रमुख श्री. राजकुमार खंबाईत, जिल्हा परिषद नाशिक तसेच शाळेचे सर्व शिक्षक यांचे शाळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
ज्ञानयात्री उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंद, ज्ञान आणि प्रेरणांचा अविस्मरणीय अनुभव ठरला.



