संविधानाचा समता स्वातंत्र्य बंधुतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा- जयवंत खडताळे*
ठाणगाव प्रतिनिधी नामदेव पाडवी

संविधानाचा समता स्वातंत्र्य बंधुतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा- जयवंत खडताळे*
प्रगतिशील लेखक संघ नाशिक शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रगतिशील लेखक संघ ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयवंत खडताळे हे हुतात्मा स्मारक या ठिकाणी बोलत होते. ‘समता स्वातंत्र्य बंधुता हा संविधानाचा गाभा आहे. हे संविधानातील विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहोचणे आजच्या चिंतनाच्या दिवशी आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
तसेच याप्रसंगी बोलताना समाजवादी चळवळ येथील प्रल्हाद मिस्त्री यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या भीषण वास्तवाबद्दल आपले मत अधोरेखित केले. तसेच याप्रसंगी कादंबरीकार तुकाराम चौधरी यांनी सुद्धा समता मुलक समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे महत्त्व विशद करताना त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व प्रतिपादन केले. प्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचे समर्पणाचे आणि देशाच्या जडणघडणमध्ये सामाजिक योगदान किती महत्त्वाचे आहे हे प्रतिपादन केले. प्रगतिशील लेखक संघाच्या सचिव शिल्केषा आहिरे यांनी महिला मुक्तीच्या निमित्ताने आणि स्त्री दासमुक्तीच्या निमित्ताने आंबेडकरांचे योगदान किती अनन्य साधारण आहे हे भारतीय स्त्रियांनी सदैव ध्यानात ठेवावे असे गौरवाद्गार याप्रसंगी काढले.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद मिस्त्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर मनोगत व्यक्त करण्यात आले. सचिव प्रल्हाद पवार यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास प्रगतीशिल लेखक संघाचे राज्य सचिव राकेश वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे,कवी पंढरी पगारे,रवींद्र मालुंजकर,गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठकसेन गोराणे , मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्रमोद अहिरे, कवी दत्तात्रेय दाणी,स्वाती वाहुळ, सोमदत्त मुंजवाडकर,आदी उपस्थित होते.



