बातमीचा इम्पॅक्ट – नाशिक ते वलसाड मार्गावर नवीन बससेवा सुरू
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

बातमीचा इम्पॅक्ट – नाशिक ते वलसाड मार्गावर नवीन बससेवा सुरू
नाशिक / वणी / बोरगाव / सुरगाणा / उंबरठाण / धरमपूर / वलसाड
स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर नाशिक–सुरगाणा–उंबरठाण–धरमपूर मार्गावरून वलसाडकडे जाणारी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सीमावर्ती भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांना आता प्रवासासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.
या मार्गावर बससेवा नसल्यामुळे प्रवाशांना दीर्घकाळापासून हालसोसावा लागतो होता. विशेषतः व्यापारिक कामानिमित्त तसेच शाळा–कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठा प्रवास करावा लागत होता. नाशिक विभागीय नियंत्रण कार्यालयाकडे स्थानिकांनी केलेल्या निवेदनानंतर हा निर्णय तातडीने घेण्यात आला.
नवीन बससेवा सुरू झाल्याने –
• नाशिक, वणी, बोरगाव, सुरगाणा, उंबरठाण आणि धरमपूरमार्गे वलसाडपर्यंत थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध.
• शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी मालवाहतुकीच्या दृष्टीने मोठा फायदा.
• सीमावर्ती भागातील रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवांकडे पोहोच अधिक सुलभ.
• दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाची भावना.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, “आमच्या मागणीला प्रशासनाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा स्वागतार्ह निर्णय आहे. आता प्रवासाचा त्रास कमी होणार आहे.”
या नवीन बससेवेमुळे ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळून अर्थकारणालाही मोठा हातभार लागणार आहे. प्रशासनाविरोधातील मागणीला प्रतिसाद देत सेवा सुरू केल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



