शॉर्टसर्किटमुळे पाळे खुर्द येथील शेतकऱ्याचे घर भस्मसात; सैसार उघड्यावर
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

शॉर्टसर्किटमुळे पाळे खुर्द येथील शेतकऱ्याचे घर भस्मसात; सैसार उघड्यावर
कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथील शेतकरी दिलीप पाटील यांच्या सडोस शिवारातील मळ्यात बांधलेल्या घराला गुरुवारी रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत घरातील सर्व सैसार, धान्यसाठा आणि घरगुती साहित्य पूर्णपणे नष्ट झाले असून कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडले आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र घराला लागलेली आग काही क्षणांतच भीषण रूप धारण करत संपूर्ण निवासस्थान भस्मसात झाले. शेतकरी दिलीप पाटील यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तोपर्यंत सर्व साहित्य जळून गेले होते.
या आगीमुळे पाटील कुटुंबावर मोठे संकट ओढावले असून तातडीने शासनाने पंचनाम्याद्वारे मदत द्यावी, अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.



