आपला जिल्हा
ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे अंतर्गत येणाऱ्या खिराटमाळ येथे स्वच्छता मोहिमेचा उपक्रम उत्साहात
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे अंतर्गत येणाऱ्या खिराटमाळ येथै
स्वच्छता मोहिमेचा उपक्रम उत्साहात
ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे अंतर्गत खिराटमाळ येथे स्वदेश फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि लोकनियुक्त सरपंच राजेंद्र निकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. गावातील सर्व ग्रामस्थ, महिला तसेच तरुण मित्रमंडळ एकत्र येत गाव परिसरातील कचरा निर्मूलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, गटारींची स्वच्छता अशा विविध उपक्रमांना हातभार लावला.
या मोहिमेत आंबोडे व खिराटमाळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजिक बांधिलकीचे उदाहरण घातले. एकत्रित प्रयत्नातून गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला.
स्वच्छता मोहिमेचा उपक्रम उत्साहात

