श्री सत्य साई सेवा मंडळाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास माजी आमदार जे. पी. गावित यांची सदिच्छा भेट

श्री सत्य साई सेवा मंडळाच्या वतीने चिंचले येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यास माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते श्री. जे. पी. गावित साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी नवदांपत्यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.
सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार मिळत असून, अशा उपक्रमांमधून सामाजिक ऐक्य व सद्भावना वाढीस लागते, असे मत श्री. गावित यांनी व्यक्त केले. श्री सत्य साई सेवा मंडळ सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षांपासून राबवत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, नवदांपत्यांचे नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा साधेपणा, शिस्त व भक्तिमय वातावरणात पार पडला.



