आपला जिल्हाक्रीडा
राशा येथे टी ट्वेंटी स्पर्धेत झुंडीपाडा संघ विजयी

राशा येथे टी ट्वेंटी स्पर्धेत झुंडीपाडा संघ विजयी
सुरगाणा तालुक्यातील राशा येथे टी ट्वेंटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात ६० संघांनी सहभाग घेतला होता. झुंडीपाडा संघाने विजेतेपद पटकावत २२ हजार रुपये रोख व ट्रॉफी मिळविली.
सहा दिवसीय स्पर्धा होती. स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान काठीपाडा येथील संघाने मिळवत १५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. वांगण (सु) येथील संघाने८ हजार रुपयांचे बक्षीस मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. सावळीराम गावित, वसंत गावित, जयंतीलाल ठाकरे, पुंडलिक महाले, मोहन गांगोडा यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली. स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज विजय पवार (झुंडी पाडा), उत्कृष्ट बॉलर तुकाराम वाघमारे (झुंडीपाडा), उत्कृष्ट बॅट्समन अविनाश कुवर (काठीपाडा)यांना विशेष बक्षिस देण्यात आले. आयोजक जयंतीलाल ठाकरे, माधव पवार, मोहन गांगोडा, सोनिराम कणसे, महेश गावित हे होते.



