भिंतबारी ते ठाणापाडा रस्त्यांमुळे शेतीची नुकसान….

भिंतबारी ते ठाणापाडा रस्त्यांमुळे शेतीची नुकसान….
*जिल्हाधिकाऱ्यांना दिले लेखी निवेदन*
दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी बोरगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी कॉ जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद यांना लेखी निवेदन दिले.
सुरगाणा तालुक्यातील भितबारी ते ठाणापाडा मार्गे गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु झाले आहे, मात्र या रस्त्यामुळे अनेक शेतकरी विस्तापित होत आहेत, त्यांना जमिनीचा योग्य तो मोबदला त्वरित मिळाला पाहिजे, शेजारील दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनायाबाबद न्याय दिला आहे, आम्हालाही नुकसानीचा मोबदला मिळाला पाहिजे. तसेच या रस्त्यामुळे स्ट्रॉबेरी, टमाटी, घेवडा, हरबरा, मसुर, गहू या पिकांवर मोठ्या प्रमाणावर धूळीचा थर साचतो, त्यामुळे पिकांची नुकसान होत आहे. लाखो रुपयाची आर्थिक हानी होत आहे.सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी असे या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी माननीय श्री आयुष प्रसाद आणि इंजिनिअर शेवाळे साहेब याच्याशी चर्चा झाली, अत्यंत महत्वाचा प्रश्न असल्याने यावर त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
निवेदन देतांना माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ जनार्दन भोये, इंद्रजित गावित, इरफान शेख प्रशांत भोये, केशव भोये, दिनकर गायकवाड, भागवत गायकवाड, हौसाबाई गायकवाड, मीराबाई पीठे उपस्थित होते.



