
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तालुकास्तरीय बैठक संपन्न
ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. रमेशभाऊ कहांडोळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने सराड येथे महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्ष निरीक्षक योगेश गायकवाड, निरीक्षक धनराज जोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत तालुका अध्यक्ष सखाराम भोये, कार्याध्यक्ष चंद्रकांत (भाऊ पाटील) भोये यांच्यासह विलास भोये, गणेश महाले, चरण थवील, डॉ. थवील, दीपक हिरे, प्रकाश कहांडोळे, सुधाकर मोरे, राजेंद्र थवील, पंडित भोये, रामदास गायकवाड, एकनाथ गायकवाड, गुरुचरण डोखे, मोतीराम गायकवाड, प्रशांत भोये, रामचंद्र भोये, गंगाराम भोये, वसंत बागुल, डी. बी. चव्हाण, चरणदास धुम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.बैठकीस उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.



