फणसपाड्यात २८ शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे नुकसान

फणसपाड्यात २८ शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे नुकसान
सुरगाणा तालुक्यातील रगत विहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या फणस पाडा येथील २८ शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे पाईप वायर स्टार्टर यांचे अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.
रगतविहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या फणसपाडा येथील देविदास गवळी, कैलास भोये, अशोक वाडेकर, अरुण सहारे, अनिकेत भोये, यशवंत गावित, गुलाब पवार, तुळशीराम सहारे, शिवराम सहारे, मधुकर सहारे, अरविंद सहारे, संतू सहारे, नरेश जाधव, रतिलाल सहारे, मनीराम सहारे, सिताराम जाधव, अनिल जाधव, किरण जाधव, रामदास दळवी, सुरेश दळवी, परसराम दळवी या शेतकऱ्यांचे वीजपंपाचे पाईप कुऱ्हाडीने तोडून टाकले आहे. यासह सोलर पंपाचेही नुकसान करण्यात आले आहे. यात नवसू सहारे, सिताराम जाधव, तुळशीराम भोये या शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासह पिण्याच्या पाण्याच्या टाकीचाही नुकसान करण्यात आले आहे.
–
फोटो
बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील फणसपाडा येथे अज्ञात व्यक्तीने तोडलेली जलपरीचे पाईप.



