ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव येथे भगवान बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरा
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

भारत सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनानिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस (JJGD) म्हणून घोषित केला आहे. यावर्षी जनजातीय कार्य मंत्रालय व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथे भगवान बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर कळवण प्रकल्पांतर्गत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून दोन टप्प्यात विशेष जनसुनावणी आयोजित करण्यात येणार आहे.
पहिले सत्र – १३ नोव्हेंबर २०२५
कळवण प्रकल्पातील सर्व ३७८ आदि सेवा केंद्रांमध्ये (ASKS) ग्रामस्थांसोबत जनसुनावणी घेण्यात येईल. जनजातीय गौरव वर्ष (JJGY) अंतर्गत हा सामुदायिक सहभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असेल.
दुसरे सत्र – १५ नोव्हेंबर २०२५
राष्ट्रीय कार्यक्रमासोबतच प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
जनसुनावणीचे उद्दिष्टे :
विकासाच्या प्राधान्यक्रमांबाबत स्थानिक जनभावना व अपेक्षा जाणून घेणे.
PM-JANMAN, DAJGUA, आदि कर्मयोगी अभियान व आदिवासी केंद्रित इतर योजनांच्या अंमलबजावणीचे पुनरावलोकन.
स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयं सहायता गट (SHGs), युवक मंडळे, आदि कर्मयोगी कॅडर व स्थानिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता.
भगवान बिरसा मुंडा व इतर आदिवासी स्वातंत्र्यसेनानींना पुष्पांजली अर्पण करून गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जनजातीय विकास, सहभाग आणि सशक्तीकरणाचा हा उपक्रम सर्वत्र उत्साहात पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



