अखिल भारतीय किसान सभेची नाशिक जिल्हा कौंसिलची अत्यंत महत्त्वाची विस्तारित बैठक जोगमोडी (पेठ) येथे घेण्यात येणार आहे

अखिल भारतीय किसान सभेची नाशिक जिल्हा कौंसिलची अत्यंत महत्त्वाची विस्तारित बैठक जोगमोडी (पेठ) येथे घेण्यात येणार आहे
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा कौंसिलची अत्यंत महत्त्वाची विस्तारित बैठक सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जोगमोडी, ता. पेठ, जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे तसेच माजी राज्य अध्यक्ष जे. पी. गावीत मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत सभासद नोंदणीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय, आगामी काळातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलनाची दिशा, वनपट्टे धारकांचे वाढीव क्षेत्र मंजुरी, स्वतंत्र ७/१२ उतारे तयार करणे, आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी व बोनसची मागणी यासह महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
तसेच पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी मांडण्यात येणार असून बाह्य स्रोत एजन्सीमार्फत होणाऱ्या भरती रद्द करून कायमस्वरूपी भरती करण्याचा मुद्दाही चर्चेला येणार आहे.
दि. २५ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा कौंसिल बैठकीतील निर्णयानुसार प्रत्येक तालुक्याने घेतलेल्या बैठकांचा व जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेचा अहवाल यावेळी सादर करावयाचा आहे. या बैठकीस जिल्हा कौंसिल सदस्यांसह प्रत्येक तालुक्यातील गाव कमिटीचे अध्यक्ष, सचिव, वन कमिटीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष सावळीराम पवार व इंद्रजीत गावित इंद्रजीत गावित यांनी केले आहे.



