# हिरीडपाडा येथील रेश्मा गायकवाड यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

हिरीडपाडा येथील रेश्मा गायकवाड यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

हिरीडपाडा येथील रेश्मा गायकवाड यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

बोरगाव | लक्ष्मण बागुल (मो. ९८२३७७९२०२)

जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी ३ जानेवारी रोजी महिला शिक्षकांना दिला जाणारा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.

सन २०२५ -२६ साठी जिल्ह्यातील सर्व गटांतून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत गटबदल करत खोल पडताळणी आणि गुणांकन प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षिकांचे वर्गस्तरीय अध्यापन कार्य, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, सहशालेय उपक्रम, सामाजिक आणि शैक्षणिक योगदान या निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले.
पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांतून शासनाने ठरवून दिलेल्या किमान अटी व शर्ती तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षिकांमधून १५ गुणवंत शिक्षिकांची निवड करण्यात आली. जिल्हा गुणवंत शिक्षिका पुरस्कार निवड समिती अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समिती बैठकीत नावे निश्चित करण्यात आली. पुरस्कारप्राप्त गुणवंत शिक्षिकांचा सन्मान करणारा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली.

पुरस्कारार्थी शिक्षिका

रेशमा भिकाजी गायकवाड (हिरीडपाडा, ता. सुरगाणा), प्रतिभा शिवमन पाटील (विजयनगर, ता. देवळा), दीपाली कारभारी आहेर (दह्याणे, ता. कळवण), योगिता यादव देवरे (दहिंदुले, ता. बागलाण), श्यामल शिवानंद सूर्यवंशी (बोलठाण, ता. नांदगाव), भारती गुलाबराव अहिरे (वाळकेवाडी, ता. चांदवड), अनिता देवीदास इंपाळ (अंधृटे, ता. पेठ), मीना निंबा देवरे (सौंदाणे, ता. मालेगाव), दीपाली रामराव मोरे (तळवाडे, ता. त्र्यंबकेश्वर), वैशाली मच्छिंद्र सायाळेकर (मुसळगाव, ता. सिन्नर), सुनीता राजेश निकुंभ (गंगाम्हाळुंगी, ता. नाशिक), दीपाली बबनराव थोरात (नळवाडपाडा, ता. दिंडोरी), सुशीला मधुकर चोथवे (घोरपडेवाडी, ता. इगतपुरी), बबिता साहेबराव गांगुर्डे (ओझर टाउनशिप, ता. निफाड), शारदा लक्ष्मण अहिरे (महादेववाडी, सायगाव, ता. येवला)

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!