# राजकारणातली मक्तेदारी: पैशाशिवाय निवडणुक नाही म्हणत राजकारणात घुसली घरानेशाहीँ. लोकहितवादी, होतकरु तरुणांना संधी देण्याची गरज – आवाज जनतेचा
राजकीय

राजकारणातली मक्तेदारी: पैशाशिवाय निवडणुक नाही म्हणत राजकारणात घुसली घरानेशाहीँ. लोकहितवादी, होतकरु तरुणांना संधी देण्याची गरज

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

राजकारण म्हटले की पैसा आणि पैशाशिवाय राजकारण नाही अशी सामान्य राजकीय कार्यकत्यांत मानसिकता पसरवून पिल्यानपिढ्या आपल्या धन्याच्या सतरंज्या ऊचलण्यात धन्यता मान्यत्त एकनिष्ठ कार्यकर्ते संपत आहेत. आणि दुसरीकडे घरानेशाही घुसवुन सर्व पदे घरातच कशी घेता येतील अशा मनसुब्यात बड़े राजकारणी आहेत. आतातरी ही मानसिकता बदलुन लोकहितासाठी कार्य करण्याऱ्या कार्यकर्त्याला निवडणुकीत टिकिट द्या अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
नविन होतकरू, लढाऊ, चेहरे राजकारणात येऊच नये इथे पिढ्यान पिढ्या आपली घराणेशाहीच राहिली पाहिजे यासाठी राजकारणी मंडळी निवडणुक पैशाशिवाय नाहीच असे नरेटिव्ह पसरवण्यात यशस्वी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
कोणती ही निवडणुक म्हटलं की पैसा लागतोच. हे या राजकीय पुढा-यांनी जनतेच्या मनात अगदी ठामपणे भरवलं आहे. ही मंडळी पैस्यातुन सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवत अगदी पिढ्यानपिढ्या जनतेची पिळवणुक करत ऐशोआरामात गाड्या, बंगले बांधून जिवनाचा आनंद घेत आहेत.
सामान्य मात्र साहेबांनी, सुख, दुःखात घरी भेट दिली, एखाद्या पार्टीला बोलावलं की खूष! त्याचे गुनगान दिवसाचे तिन्ही प्रहर गात बसणार आणि यांच्या प्रसिद्धीला मोठा हातभार लावणार. हाच नेता बैठकीत सांगणार की आता कोणतीच निवडणुक सोपी नाही राहिली. ग्रामपंचायतीला पंधरा विस लाख आणि जिल्हा परिषदसाठी कोटी दिड कोटी झालं इथच संपलं. हाच प्रचार मग नेत्यांची पिलावळ गावात गप्पा मध्ये करत राहाते. याचा परिणाम चांगली होतकरु, लढाऊ पोरं राजकारणा पासुन दुरच राहातात. यात नेमकी मेख ही ज्या वेळी सामान्य माणुस अडचनीत असतो त्या वेळी ही मंडळी गायब असते. पैसा देऊन निवडणूक जिंकलेले हे लोक मदत मागायला गेलेल्या कार्यकत्यार्ला म्हणुन दाखवतात की तु का फुकट
मत दिलं का म्हणून. हिनवले जाते.
आता ज्या लोकांना आपण वारंवार निवडून देतो ते लोक किती वेळा शेतकरी, सामान्यांसाठी रस्त्यावर उतरले? आंदोलने केले? हा संशोधनाचा भाग आहे. नुकतीच परिस्थीती पहा अतिवृष्टी झाली, पुर आले, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले पण एका तरी जिल्हा परिषद सदस्याने शेतक-यासाठी आंदोलन छेडण्यात आले का.

अगदी त्या नेत्याचा फोटो स्टेटस ठेऊन साहेबांना मिरवतोय, त्याचे गुणगाण गात फिरतोय. ही मंडळी निवडणुका आल्या की याच कार्यकर्त्याच्या पायाला भिंगरी बांधुन फिरवतात.
स्वतःचा हेतू साध्य करून घेतात. निवडणुकीनंतर सामाजिक संकट काळात या लोकांच्या नावाने सोशल मिडियात शिमगा करण्यापेक्षा निवडणुक हिच खरी वेळ असते समाजा साठी ख-या अर्था लढणारे तरुण मैदानात उतरवले पाहिजे. त्यांना बळ दिलं गेलं तरच न्याय मिळवता येईल.

जनतेने कोणताही पक्ष, पार्टी न पाहता पैशाशिवाय कोणतीच निवडणुक लढणे शक्य नाही असे नरेटिव्ह पसरुन पैशावर निवडणुका जिंकता येतात हे मिशन हाणून पाडत धनदांडग्यांना आता घरी बसवने काळाची गरज बनली आहे.
_

यांसाठी आंदोलन उपोषण केलं का? हा विचार नविन पिढीने केलाच पाहिजे. जो पर्यंत मतदार पैसे घेउन विकला जाणार तो पर्यंत याच लोकांच चांगभलं होणार. आणि जनतेचे नेहमी प्रमाणे हाल होणार हे नक्की.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!