*आंबोडे ग्रामपंचायत कडून किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप*
ग्रामीण भागात आजही आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषत: महिलांकडून मासिक पाळीच्या काळात आवश्यक ती काळजी न घेतल्याने अनेक आजार उद्भवतात. याच बाबींचा विचार करून आंबोडे ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त सेस निधीतून माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळा तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था आंबुपाडा बेडसे येथील किशोरवयीन मुलींना लोकनियुक्त सरपंच राजेंद्र निकुळे यांच्या हस्ते मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
मासिक पाळीच्या काळात आराेग्याची कशी काळजी घ्यावी, पॅडचा वापर का आवश्यक आहे इत्यादीबाबत महिलांचे प्रबोधन करण्यात आले आहे व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वापराबाबत डॉ. सायली आमोलीक, समुदाय आरोग्य अधिकारी पांडुरंग हारदे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य हरिश्चंद्र अलबाड, एस.डी. मलावडे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थीनी उपस्थित होत्या.