सुरगाणा तालुक्यात धक्कादायक फंडा! — कार्यकर्ते बना आणि लाखोंची टेंडरं उचला” अशा प्रकारांचा भडिमार; विकासकामांचा दर्जा तळाला
सुरगाणा तालुक्यात धक्कादायक फंडा! — कार्यकर्ते बना आणि लाखोंची टेंडरं उचला” अशा प्रकारांचा भडिमार; विकासकामांचा दर्जा तळाला

सुरगाणा तालुक्यात तिखट मिरची मसाला लावणारा धडाकेबाज खुलासा
सुरगाणा तालुक्यात सध्या एक असा भयंकर आणि अविश्वसनीय प्रकार सुरू असल्याची चर्चा जोरात आहे की, सामान्य नागरिकांचा संताप सातव्या आसमानाला पोहोचला आहे. कार्यकर्ते बना आणि लाखोंच्या टेंडरांची पावती घरी घेऊन जा!” असा गुप्त राजकीय फंडा मोठ्या प्रमाणावर राबवला जात असल्याचे उघड झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या काळात हे कार्यकर्ते मतदारांशी संगनमत करून मतदानाचा आकडा चढवण्याचे काम करतात. बदल्यात सत्ता मिळाल्यानंतर त्यांना सुवर्ण टेंडरांची मेजवानी देण्यात येते.
याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असून, तालुक्यातील विकासकामांचा दर्जा कोसळून तोंडावर पडलाय.
रस्ते कामे, गटारी, इमारती, ग्रामविकास प्रकल्प —
▪️ कागदावर सर्व उत्तम, पण
▪️ प्रत्यक्षात ढिसाळ, अर्धवट आणि फसवे काम!
अशा तक्रारी नागरिकांकडून सातत्याने आवाज उठवत आहेत. “टेंडर मिळवण्यासाठी राजकीय दलाली नको, दर्जेदार काम हवे!” अशा संतप्त प्रतिक्रिया गावोगाव उमटत आहेत.सुरगाणा तालुका आज भ्रष्टाचार, राजकीय संरक्षण आणि ठेकेदारांची संगनमत याच्या चक्रव्यूहात सापडला असून या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी व्हावी, अशी गावकऱ्यांची जोरदार मागणी आहे.



