हतगड गटात राष्ट्रवादीचे ऋषिकेश पवार इच्छुक उमेदवार; युवा उमेदवारामुळे उत्सुकता वाढली

हतगड गटात राष्ट्रवादीचे ऋषिकेश पवार इच्छुक उमेदवार; युवा उमेदवारामुळे उत्सुकता वाढली
सुरगाणा तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या हतगड गटात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजताच राजकीय वातावारणात चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऋषिकेश नितीन पवार हे इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले पक्षाने उमेदवारी दिल्यास मी उमेदवारी करण्यास तयार आहे. यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत स्थानिक पातळीवर उत्सुकता तयार झाली आहे. जर जनतेने मला निवडून दिल्या स कळवण सुरगाणा मतदार संघाचे आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून विकास कामे करण्याची संधी द्यावी. अशी जनते कडून अपेक्षा करित आहे.
युवा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या ऋषिकेश पवार यांनी सांगितले की, “मी नेहमीच कार्यकर्ते आणि ग्रामस्थांसोबत राहून काम केले आहे. मला संधी दिल्यास विकासकामांना प्राधान्य देत गटाचा सर्वांगीण विकास घडवून आणणार आहे. मला सहकार्य करून निवडून देण्यात यावे.
नवीन गटाच्या निर्मितीनंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने विविध पक्षांचे रणनीती आखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामध्ये पवार यांच्या इच्छुक उमेदवारीमुळे गटातील राजकीय समीकरणांमध्ये रंगत वाढली आहे. ग्रामस्थांमध्येही चर्चांना उधाण आले असून हतगड गटाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



