भारतीय जनता पार्टी–सुरगाणा मंडळाची तातडीची बैठक हतगड येथे संपन्न झाली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांचे जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

भारतीय जनता पार्टी–सुरगाणा मंडळाची तातडीची बैठक हतगड येथे संपन्न झाली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांचे जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. एन. डी. गावित, आदिवासी आघाडी नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष विनायक गावित, नाशिक उत्तर जिल्हा सरचिटणीस कल्पना भरसट ,माजी जिल्हा परिषद सदस्या कलावती चहाण, नाशिक उत्तर जिल्हा चिटणीस मनोहर धूम, सुरगाणा तालुका अध्यक्ष विठ्ठल गावित, बाऱ्हे मंडलाध्यक्ष राजेंद्र निकुळे, माजी तालुका अध्यक्ष सुनील भोये, लक्ष्मण जाधव,नगरसेवक विजय कानडे, संजय पवार,जानकी देशमुख, माजी तालुका अध्यक्ष रमेश थोरात, जेष्ठ नेते भावडू चौधरी, NDCC बँक संचालक ललित चहाण, अण्णा भरसट ,इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्ष संघटन मजबुतीकरण, आगामी स्थानिक राजकीय घडामोडी, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण व विकासकामे वेगाने राबविण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विविध विभागांची माहिती घेऊन पुढील रणनीतीवरही मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरगाणा तालुका उपाध्यक्ष मुरलीधर ठाकरे यांनी केले. यावेळी विनायक गावित, मोहन जाधव, दादाराव जाधव, , कल्पना भरसट, कलावती चहाण, मधुकर चौथवा, कृष्णा बोरसे, उत्तम भोये, अशोक (पिंटू) पवार – युवा मोर्चा, हर्षवर्धन गावित – शहर अध्यक्ष दिनकर पिंगळे यांना नियुक्त पत्र देण्यात आले.
बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षविस्तार आणि जनसंपर्क मोहीम अधिक जोमाने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.



