साजोळे ग्रामपंचायतीस ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रमाणपत्र
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

साजोळे ग्रामपंचायतीस ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रमाणपत्र
सुरगाणा तालुक्यातील साजोळे ग्रामपंचायतीला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र इंटरकॉण्टिनेंटल सिस्टमसर्ट प्रा. लि. (ISPL Cert) यांच्यामार्फत देण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, कार्यक्रम व मार्गदर्शनानुसार प्रभावीपणे राबविल्या जात असल्याची दखल घेऊन हे मानांकन प्राप्त झाले आहे.
साजोळे ग्रामपंचायतीच्या प्रशासनिक कामकाजात पारदर्शकता, सेवा गुणवत्तेत सातत्य, नागरिकाभिमुख कार्यपद्धती तसेच विकासकामांमध्ये शिस्तबद्ध नियोजन यांचा अवलंब केला जात असल्याचे मूल्यांकनात आढळून आले. त्यानुसार ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना ISO 9001:2015 मानकांची पूर्तता होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रमाणपत्राची प्रारंभिक नोंदणी व प्रमाणपत्र दिनांक २६ डिसेंबर २०२५ असून, पहिली निरीक्षण तपासणी १७ डिसेंबर २०२६ पूर्वी, दुसरी १७ डिसेंबर २०२७ पूर्वी तर पुनःप्रमाणन दिनांक २५ डिसेंबर २०२८ आहे.
या यशाबद्दल साजोळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वैशाली देवरे, उपसरपंच पुष्पपा गांगुर्डे , कर्मचारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख सेवा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.



