# कळवण तालुक्यात सतर्क नागरिकांमुळे गोवंशाची तस्करी रोखली; टाटा सफारीसह ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरी

कळवण तालुक्यात सतर्क नागरिकांमुळे गोवंशाची तस्करी रोखली; टाटा सफारीसह ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळवण तालुक्यात सतर्क नागरिकांमुळे गोवंशाची तस्करी रोखली; टाटा सफारीसह ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)

कळवण  तालुक्यातील हळदबरडा गावातील सतर्क रहिवाशांमुळे गोवंशाची अवैध तस्करी करण्याचा डाव उधळून लावण्यात आला आहे. टाटा सफारी गाडीतून कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने नेली जाणारी चार जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली असून, वाहनासह एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मोहपाडा ते हळदबरडा जाणाऱ्या रोडवर गिरणा नदीच्या पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. टाटा कंपनीची सफारी गाडी (क्रमांक: MH 14 BX 5756) संशयास्पद रितीने जात असताना हळदबडा येथील नागरिकांनी ती रोखली. यावेळी जयराम कवर, जगन कवर, भास्कर कवर, प्रकाश पवार, अरुण पवार, अशोक गांगुर्डे, नामदेव पवार, विजय गायकवाड, संतोष गावित या नागरिकांचा हिसका बघून चालक गाडी सोडून फरार झाला.
जप्त केलेला मुद्देमाल आणि जनावरे
गाडीची झडती घेतली असता, त्यात गाडीचे मागील शीट काडून विनापरवाना आणि अत्यंत निर्दयतेने पाय बांधून कोंबलेली चार जनावरे आढळून आली. यामध्ये खालील जनावरांचा समावेश आहे:
* काळ्या रंगाचा गोरा: पांढरे ठिपके असलेला (अंदाजे किंमत ४,००० रु.)
* लाल रंगाचा गोरा: अंदाजे एक वर्ष वयाचा (अंदाजे किंमत ३,००० रु.)
* काळ्या व राखाडी रंगाची गाय: सात वर्ष वयाची (अंदाजे किंमत १०,००० रु.)
* तांबड्या रंगाची गाय: जिच्या उजव्या कानावर पिवळ्या रंगाचा बिल्ला (क्र. ३७००२२, ६१५०२०) असून किंमत अंदाजे ८,००० रुपये आहे.
या चार जनावरांसह गुन्ह्यात वापरलेली टाटा सफारी गाडी असा एकूण ४, २५, ००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कायदेशीर कारवाई
अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* गुन्हा रजि. नंबर: ०१/२०२६
* कलमे: महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ (ड), तसेच महाराष्ट्र गोवंश हत्या प्रतिबंधक (सुधारित) कायदा १९९५ चे कलम ५, ५ (ब), ९ आणि ९ (अ).
पोलीस तपास सुरू
सदर कारवाई अभोणा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फरार चालकाचा शोध सुरू असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबनराव पाटोळे व पोलीस अंमलदार एस. आर. महाले, पोलीस नाईक सुरेश पवार, या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हळदबरडा येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच रोखता आले, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!