सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा येथील रहिवासी अर्जुन महादु जाधव (८०) यांच्या घराला बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) दुपारी चहा करीत असताना अचानक गॅस सिलेंडरचा भडका होऊन घराला आग लागून त्यात घरातील जीवनावश्यक वस्तूचे व घराचे नुकसान झाले. इतर वस्तू पूर्णपणे जाळून खाक झाल्या. बाबा घरामध्ये एकटेच राहतात. आजच्या घडीला त्यांना मदतीशिवाय पर्याय उरला नाही. छोटीशी मदत म्हणून नाशिकच्या आयडियाझम सामाजिक संस्थेतर्फे तेल, साखर, रवा, खवा, बेसन, फराळ, ब्लकेट या घरगुती वस्तू देण्यात आल्या.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.