वांगणसुळे येथून त्र्यंबकेश्वर कडे पायी दिंडीचे प्रस्थान

वांगणसुळे येथून त्र्यंबकेश्वर कडे पायी दिंडीचे प्रस्थान
वांगणसुळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून त्र्यंबकेश्वरपर्यंत निघणारी ही पालखी खरोखरच भक्ती आणि परंपरेचा एक सुंदर संगम आहे. वांगण सुळे ते त्र्यंबकेश्वर
हा पालखी सोहळा अनेक महान साधू-संतांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अविरतपणे सुरू आहे.
प्रमुख मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान कैलासवासी काशीराम बाबा मांगदेकर व मोरे बाबा पाहुचीबारीकर
तसेच ह भ प मिसाळ बाबा कळमणेकर,नारायण बाबा पारपाडाकर, परसराम चौधरी, मुरलीधर बाबा, सखाराम महाराज आणि गोविंद बाबा धूम यांच्या पावन स्मृती आणि आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतो.या सोहळ्याचे आयोजक गावचे पोलीस पाटील परसराम चौधरी हे करीत असतात या दिंडीमध्ये परिसरातील हजारो भाविक मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने सामील होतात. संत निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वरांचे गुरु आणि थोरले बंधू त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी वारकऱ्यांची ही ओढ शब्दांत वर्णन करण्या पलीकडचे असते.या प्रवासासाठी दिंडी सोहळ्याचे नियोजन शिस्त बंद वाटचाल,रस्त्यावरून चालताना वाहतुकीचे नियम पाळा आणि आपली दिंडी शिस्त बंद ठेवा, आरोग्याची काळजी,सध्याच्या हवामानाचा विचार करता पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्रथमोपचार साहित्य सोबत आहे असे आयोजक परशराम चौधरी यांनी म्हटले आहे.
*********
वाटेत विठ्ठल रुक्माई आणि निवृत्तीनाथांच्या वातावरण मंगलमय राहीलच याच शंका नाही.पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली न्यानेश्वर महाराज की जय संत निवृत्तीनाथ महाराज की जय मंगलमय भक्तीचा प्रवास रस्त्यात होत असतो.
-परशराम चौधरी
पोलीस पाटील वांगणसुळे


