हतगड येथे केंद्रीय अधिकाऱ्यांचा वनपट्टा क्षेत्रीय पाहणी दौरा

हतगड येथे केंद्रीय अधिकाऱ्यांचा वनपट्टा क्षेत्रीय पाहणी दौरा
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियम २००६ तसेच नियम २००८ (सुधारित नियम २०१२) यांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने दि. २ व ३ जानेवारी २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यात केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाच्या अधिकारी पथकाने क्षेत्रीय पाहणी दौरा केला. वैयक्तिक व सामूहिक वनहक्कांच्या (IFR व CFR) अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला.
वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी AI आधारित FRA Atlas व Web GIS आधारित Decision Support System (DSS) विकसित करण्याच्या दृष्टीने जनजातीय कार्य मंत्रालयाने Smart India Hackathon (SIH)-2025 मध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात IFR व CFR क्षेत्रात झालेली लक्षणीय प्रगती लक्षात घेऊन SIH-2025 च्या भाग म्हणून नाशिक जिल्ह्याची क्षेत्रीय पाहणीसाठी निवड करण्यात आली आहे.
या अनुषंगाने कळवण तालुक्यातील कोसवण तसेच सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे वनपट्टा मंजूर लाभार्थ्यांच्या शेतीसाठी वापरात असलेल्या जमिनीवरील पिकांची केंद्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हतगड (सुळपाडा) येथे वैयक्तिक व सामूहिक वनहक्क धारकांशी संवाद साधून त्यांना मिळालेल्या शासकीय योजनांचा लाभ, वनपट्ट्यानंतर झालेला आर्थिक फायदा, शेतीतील बदल याची माहिती घेतली.
यावेळी स्ट्रॉबेरी लागवडीबाबत रोपे कुठून आणली जातात, लागवडीचा खर्च किती येतो, उत्पादनातून होणारा फायदा आदी बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व जमिनींची मोजणी करून पुढे स्वतंत्र सातबारा देण्यात येईल, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. त्यानंतर वैयक्तिक वनजमिनींची सखोल क्षेत्रीय पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात मा. ओमकार बिरादर, करण लांडे, अमोल राक, साहिल वाडस्कर, रोनक झा, कोमल गुप्ता, गीता कोडाबागी, अरुण कुमार, व्ही. शिंधुश्री, जि. साई. ज्योतिका, बाणानीथ्यश्री, पुलुमामिदी विजयकुमार, एम. व्यंकटरामणाचार्य, ए. विष्णुवर्धन रेड्डी, इशिका जैन, जयेश मालवीया, आशमी गुप्ता, हर्षित गौड, जिल्हा वनव्यवस्थापक कदम, आदिवासी विकास विभाग नाशिकच्या जगताप मॅडम, सुरगाणा तालुका वनव्यवस्थापक भरत पगार, कळवण तालुका वनव्यवस्थापक बंगाळ, हतगड वनसमिती अध्यक्ष लक्ष्मण पवार, सदस्य हिरा गावित, काळा भोये, सुशीला गांगुर्डे, हतगड (CFR) समिती अध्यक्ष अंकुश दळवी, ग्रामसेवक के. के. पवार, तलाठी स्वप्नील पालवी, वनपाल शशिकांत ढाकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये तसेच पुंडलिक पवार, पांडुरंग पवार, रंगनाथ पवार, भगवान गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.


