आपला जिल्हा
बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती साजरी
प्रतिनिधी ठाणगाव नामदेव पाडवी

बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती साजरी
बाऱ्हे वार्ताहर | नामदेव पाडवी
स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी नेत्या व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती बाऱ्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास अभिवादन करण्यात आले. महिलांच्या शिक्षणासाठी व समानतेसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. निलंबरी गायकवाड, अधिपरिचारिका रोहिणी पाटील, ज्योती चव्हाण, हेमलता भुसारे, प्रयोगशाळा अधिकारी जागृती वसईकर, कनिष्ठ लिपिक राहुल बापट, औषध निर्माण अधिकारी जयंत शिंदे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.



