दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक येथे पार पडलेल्या 19 वर्ष वयोगटाच्या विभागस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत, आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगून येथील मुलींनी *4×400 रिले* खेळ प्रकारात उत्कृष्ट खेळ करत राज्य पातळीवर झेप घेतली आहे.या रिले स्पर्धेत वंदना सखाराम वालवणे, अश्विनी मोहन चौधरी, योगिनी भरत भोये,सोनाली एकनाथ राऊत, वंदना एकनाथ भोये या खेळाडू मुलींनी उत्तम खेळत करत प्रथम क्रमांक मिळविला, आणि दिमाखात *रिले संघ राज्य स्तरावर पोहचवला.
मुलींच्या संघाने विभागस्तरावर प्रभावी खेळ करून राज्य स्तरावर झेप घेतल्याने शिक्षण संस्थेचे, शाळेचे आणि तालुक्याचे नाव उंचावल्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जे पी गावित, संचालक मंडळ, समन्वयक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडू मुलींचे, मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे..
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.