

#

आजही कार्यकर्ते आणि सामान्य जनता त्यांच्या कुटुंबाकडे जाऊन सुख दुःख जाणून घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ही त्यांना मोलाची साथ होती, तसेच भावि काळात मुलगा समीर चव्हाण आणि पत्नी श्रीमती कलावती चव्हाण यांच्याकडे मतदार संघातील जनता अपेक्षा व्यक्त करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात तसेच आदिवासी बहुल सुरगाणा आणि कळवण येथे चव्हाणांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी साठी कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा व आदिवासी क्षेत्रात विकासकामे करावेत ही जन भावना आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र चव्हाण यांनी एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि बालेकिल्ला असलेला नाशिक जिल्हा, परंतु २००४-०५ नंतर संपूर्ण जिल्ह्यात तळागाळातील लोकांपर्यंत भाजप पक्ष पोहचवला आणि पक्षाला नवीन ओळख दिली. आता पक्षीय नेतृत्वाने चव्हाण कुटुंब आणि त्यांचे कार्यकर्ते यांना बळ देऊन जिल्ह्यातील हरिश्चंद्र चव्हाणांचे अपूर्ण कार्य पुढे चालू ठेवावे हीच खरी स्वर्गीय चव्हाण साहेबाना श्रद्धांजली.