राणी स्क्रुवाला व झरिना स्क्रुवाला यांनी स्वदेस फाऊंडेशन संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील जीवनमान कसे सुधारेल याकडे लक्ष दिले. ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणी योजना, फळबाग लागवड, बांबु लागवड कौशल्य प्रशिक्षण, बांधकाम प्रशिक्षण, मोतीबिंदू शिबीर, आरोग्य शिबीर, शेळी प्रकल्प अशा अनेक योजना संस्था आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवा, यासाठी जोडधंदा म्हणून शेळीपालन हा प्रकल्प सुरगाणा तालुक्यातील बिरसा मुंडा गाव विकास समिती खिर्डी येथे राबवून २९ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ शेळ्या वाटप करण्यात आल्या.
शेळ्यांना राहण्याची व्यवस्था, पाणी, चारा, लसीकरण आदीसह विविध विषयावर स्वदेस फाऊंडेशनचे अरुण सुबर यांनी लाभार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बिरसा मुंडा गाव विकास समिती खिर्डी चे सदस्यसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.