# सुरगाणा येथे आरोग्य शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून मोफत शिबीर – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

सुरगाणा येथे आरोग्य शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून मोफत शिबीर

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा येथे आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग, एसएमबीटी हॉस्पिटल व एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात सर्वसाधारण तपासणी, रक्तदाब, रक्तशर्करा, हृदयविकार, स्त्रीरोग, बालरोग, नेत्रतपासणी, दंतरोग यासह विविध आजारांसाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात आले होते. एसएमबीटी हॉस्पिटलच्या टीमने आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने तपासणी केली. ग्रामीण भागात उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या हेतूने हे शिबिर उपयुक्त ठरले.

कार्यक्रमास जि. प. च्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रणवीर, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. पुरकर, एसएमबीटी हॉस्पिटलचे डॉ. अरुण चौधरी, डॉ. वैशाली इंगळे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू पवार, शहराध्यक्ष मनोज शेजोळे, उपजिल्हाध्यक्ष नवसू गायकवाड, राजू पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष भास्कर अलबाड, दिनेश चौधरी, नगरसेविका जयश्री शेजोळे, सरपंच तुळशीराम महाले, तुकाराम देशमुख, मंजित चौधरी व अशोक गवळी उपस्थित होते.
रुग्णाच्या हस्ते शिबिराचे उदघाटन

सुरगाणा येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद‌्घाटन मुरुमदरी येथील रुग्ण अहिल्याबाई गायकवाड यांच्या हस्ते फित कापण्याचे सूचवत लोकशाही मूल्यांचा आदर जपला. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांचे कौतुक केले.

फोटो

सुरगाणा : शिबिराचे फीत कापून उदघाटन करताना रुग्ण अहिल्याबाई गायकवाड. समवेत आमदार नितीन पवार, जयश्री पवार, वैद्यकीय अधिकारी.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!