स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच सुरगाणा तालुक्यातील राजकारण तापलं आहे. दिग्गज नेते, कार्यकर्ते आणि समाजसेवक सर्वजण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून, काहींना प्रचारातून संधी साधायची आहे. काही तर आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी तयार आहेत. जनतेच्या समस्या गेल्या खड्ड्यात पहिले आपले खिसे गरम करा.
मात्र या सगळ्या राजकीय गदारोळात सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत नागरी सुविधांकडे मात्र दुर्लक्ष झालं आहे. विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्या बेरोजगारीसारख्या ज्वलंत प्रश्नांकडे कोणाचेही लक्ष नसल्याचं चित्र दिसत आहे.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गावा-खेड्यांत, गल्लीबोळांत एकच चर्चा रंगली आहे — “कोणत्या गटातून कोण उभं राहणार?” सोशल मीडियावर पोस्ट, बॅनर, आणि व्हिडिओंचा पाऊस सुरू असून, “निर्धार विजयाचा – संकल्प विकासाचा” अशा घोषणा जोरात झळकत आहेत.परंतु, या गोंधळात गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, आणि शिक्षणाच्या समस्या मात्र पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. निवडणुकीच्या काळात भुलथापांचे वारे वाहत असले तरी आता जनता अधिक सजग आणि हुशार झाली आहे. “वेळ आल्यावर बघून घेऊ” असा सूर मतदारांच्या मनात स्पष्ट ऐकू येत आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.