कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन जनजातीय प्रशिक्षणार्थी आत्मनिर्भर व्हावे. – बाळासाहेब क्षीरसागर
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन जनजातीय प्रशिक्षणार्थी आत्मनिर्भर व्हावे.
– बाळासाहेब क्षीरसागर
उंबरठाण ता. सुरगाणा – कौशल्य विकास व उद्योजकत मंत्रालय भारत सरकार व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनजातीय आदिवासी कौशल्य विकास उंबरठाण उपकेंद्राच्या उदघाटन व प्रशिक्षण किट वाटप प्रसंगी श्री बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष, जन शिक्षण संस्थान] नाशिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . ते पुढे असेही म्हणले की कौशल्य प्रशिक्षणाचा या समाजाला उपयोग झाला पाहिजे म्हणून जनजातीय आदिवासी कौशल्य विकास उपकेंद्रा विविध व्यासायिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे . आज खेडयात/ शहरात प्लंबर मिळत नाही त्यामुळे खुप अडचणी निर्माण होतात . जनजातीय आदिवासी कौशल्य विकास या प्लंबिंग , सोलर पी व्ही हेल्पर , मधुमक्षिका पालन , सफाई मित्र , बांबू पासून विविध वस्तू बनविणे , अशा अनेक कोर्सेस चा समावेश करण्यात आला आहे . “आदिवासी भागातील महिलांनी व युवकांनी स्थानिक गरजा ओळखून विविध कौशल्ये आत्मसात करावे, त्यासाठी जनजातीय आदिवासी कौशल्य विकास केंद्र, जन शिक्षण संस्थान, नाशिक आपल्या मदतीला नेहमीच पाठीशी उभे राहील” असा विश्वास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती, तथा जन शिक्षण संस्थान नाशिकचे, चेअरमन मा. श्री. बाळासाहेब क्षिरसागर यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक राहुल ठाकरे यांनी केले ते म्हणाले कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्लीकडून महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, नाशिक ह्या तीनच जिल्ह्यास प्रथमच जनजातीय आदिवासी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली, ह्या सर्व जिल्हयाच्या केंद्रातून शिवणकाम प्रशिक्षणाची नोंदणी उंबरठाण येथील आदिवासी प्रशिक्षणार्थी यांनी केल्यामुळे त्यांचे कौतुक यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून केले. “शालेय विद्यार्थ्यांना जर शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनामध्ये विविध कौशल्य शिकविले तर निश्चितपणे शाळेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी स्वतःच्या पायावर भविष्यात उभा राहील” असा विश्वास ह्या समारंभाच्या अध्यक्षा तथा डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा, मा. हेमलता बिडकर यांनी व्यक्त केला.
ह्या प्रसंगी माजी प्रशिक्षणार्थी पूनम जाधव, ज्योती धूम, आशा गावित ह्यांनी आपल्या व्यवसायाची यशोगाथा सांगितली आणि उपस्थित मान्यवरांची मने जिंकून घेतली.
पाहुण्यांचा परिचय डॉ. एकनाथ आहेर प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठाण यांनी करून दिला. ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती प्रा. भीमराज काळे , संचालक , लासलगांव बाजार समिती, जनजातीय आदिवासी कौशल्य विकास केंद्र दिंडोरी येथील कार्यक्रम अधिकारी शुभम जाधव, जन शिक्षण संस्थान, नाशिकचे कार्यक्रम सहाय्यक अधिकारी दत्तात्रय भोकनळ, त्याचसोबतच जन जातीय कौशल्य विकास केंद्र दिंडोरी येथील कार्यक्रम सहायक अधिकारी प्रतिक ठाकरे, विवेक शिंदे, ज्योती उराडे, हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात २० प्रशिक्षणार्थी याना शिवणकामाचे किट वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. कलावती थविल केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. हेमलता महाले यांनी मानले
सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उंबरठाण महाविद्यालयाचे, , प्रा. काळे किशोर, प्रा. देशमुख उमा, प्रा. मधुकर गावित, प्रा. सुभाष पवार, प्रा.तुळशीराम चौधरी, प्रा. मंदिप राऊत, प्रा. राजाराम कणसे, प्रा. राजेश पेटार, श्री. अनिल कदम,श्री.अनिल ठाकरे, श्री. हिरामण गावित, सौ. यशोदा गावित मार्गदर्शक शिक्षक पुष्पा जाधव आदींनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.



