बाऱ्हे येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे पर्यावरण जनजागृती, ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यालयाचे प्राचार्य मधुकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रगती अभियान नाशिकच्या श्रीम. अश्विनी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, ग्रामसभेची भूमिका, ग्रामपंचायतीद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
या मार्गदर्शन कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार नामदेव पाडवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन अहिरे यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस.टी. बागुल सर यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.