शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सालभोये येथे पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सालभोये येथे आज दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यार्थी–विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन बालदिन साजरा करण्यात आला.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांप्रती त्यांचे अपार प्रेम, त्यांच्यासोबत गप्पा-गोष्टी करण्याची आवड आणि भारताच्या स्वातंत्र्य व प्रगतीसाठी त्यांनी केलेले योगदान यांविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आढावा देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक पी. एस. गवळी, बी. डी. भोये, एम. आर. बहिरम, जी. एच. भोये, एस. वाय. गायकवाड, चव्हाण सर, गावित सर, एन. आर. खबाईत, बी. ई. वाघमारे, एच. पी. बहिरम व वाय. एम. भोये उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पी. एच. बागुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एम. कोल्हे यांनी केले.