¢त्र्यंबकेश्वर येथे १३ वर्षीय मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी रियान मतीन नांयकवाडे (१९, रा. राजवाडा) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने मुलीचा वारंवार पाठलाग करून “तू माझ्याशी लग्न कर” असे सांगत त्रास दिला. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.