ब्रेकिंग न्यूज : फुलेमाळवाडीत चार जणांचा मृत्यू – पतीने पत्नी व दोन मुलांची हत्या करून केली आत्महत्या
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

ब्रेकिंग न्यूज : फुलेमाळवाडीत चार जणांचा मृत्यू – पतीने पत्नी व दोन मुलांची हत्या करून केली आत्महत्या
देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथे रविवारी सकाळी पहाटे हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एक ४० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पत्नीसह दोन लहान मुलांचा खून करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये गोविंद बाळकृष्ण शेवाळे (४०), पत्नी कोमल (३५), मुलगी खुशी (८) आणि मुलगा श्याम (१.५ वर्षे) यांचा समावेश.
घटनास्थळी सुसाइड नोट सापडली
कौटुंबिक वाद आणि इतरांच्या लुडबुडीला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख असलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाताला लागली. घटनेच्या काही तास आधी गोविंद यांनी व्हॉट्सअॅपवर चारही जणांचे ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे स्टेटस ठेवले होते, ही बाब अधिक धक्कादायक.
तपास सुरू
देवळा पोलिस घटनास्थळी दाखल असून गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे. गावात शोकाकूल वातावरण पसरले आहे.



