# सुरगाण्यात बीएसएनएलचे 33 टॉवर कार्यान्वित – आवाज जनतेचा
आपला जिल्हाराजकीय

सुरगाण्यात बीएसएनएलचे 33 टॉवर कार्यान्वित

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाण्यात बीएसएनएलचे 33 टॉवर कार्यान्वित

मेक इन इंडिया माध्यमातून सुरगाणा तालुक्यात बीएसएनएल 33 टॉवर उभे राहल्याने बीएसएनएलचे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असून दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. या सुविधांमुळे ऑनलाईन शिक्षण व इतर सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे.
सुरगाणा तालुका नाशिक जिल्हातील विकासात्मक दृष्टीने तसा मागे आहे. हळूहळू आपले हक्क, योजना जनतेच्या जागृतीमाध्यमातून एकत्र येऊन आपल्या भागातील सोयी सुविधा मागण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक संस्था यांच्या कडून मागणी करून प्रयत्न करताना दिसत आहे. सुरगाणा तालुक्यात सन 2018-2019 दरम्यान अनेक गावात मोबाईल सेवा उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु जिओ टॉवर माध्यमातून काही भागात रेंज उपलब्ध झाली परंतु काही गावात अद्यापही मोबाईल नेटवर्क नसल्याने जनतेने स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला. याची दखल केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पाठपुरावा सुरु करून बी एस एन एल टॉवर मंजूरी साठी प्रयत्न करण्यात आले. आज सुरगाण्यात 33 ते 35 टॉवर दिमाखात उभे राहून अनेक गावात मोबाईल नेटवर्क काही अंशी सुरुवात करण्यात आले आहे. काही अंशी तांत्रिक कारणामुळे येत्या 4 ते 5 दिवसात सर्व बी एस एन एल मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध होणार आहे. लवकरच सरमाळ, केळावण, उंडओहळ, कहांडोळपाडा शेपूझरी, कहांडोळपाडा वांगंपाडा, भेनशेत, सरमाळ, म्हैसमाळ, सुळे नवीन टॉवर नेटवर्क ग्राहकासाठी सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीएसएनएल सिम नेटवर्क सेवा स्वस्त असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकाना परवडणारी आहे. बीएसएनएल सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी आणि नेटवर्क सेवा दर्जेदार मिळावी, म्हणून युवा नेटकरी यांचे म्हणणे असून ज्या गावात दुरसंचार टॉवर उभे आहेत अशा गावांना सिम कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

भेनशेत, सरमाळ, उंडओहळ, कहांडोळपाडा शेपूझरी, कहांडोळपाडा वांगणपाडा, केळावण, म्हैसमाळ या गावांना भारत संचार निगम कंपनीचे मोबाईल टॉवर उभे केले आहे. येत्या चार पाच दिवसात मोबाईल नेटवर्क सुविधा सुरु होईल. ग्राहकाना लवकर सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सागर शिंदे, व्यवस्थापक बीएसएनएल

सुरगाणा सारख्या दुर्गम भागात नळ पाणी योजना, रस्ते, वीज, दळणवळण सुविधा, आरोग्य सुविधा, मोबाईल टॉवर नेटवर्क समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहे. ते आजच्या स्थितीत दुर्गम दुर्लक्षित सुरगाणा तालुक्यातील खेड्यात उपलब्ध करून देण्यात आले. आज मोठ्या प्रमाणात नेटवर्क टॉवर उपलब्ध झाले आहेत.
डॉ. भारती पवार, माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!