
हातरुडी (ता. सुरगाणा)येथील तरुण राजू काशिनाथ दळवी (वय ३५) हा गेल्या वीस दिवासंपासून घरातून कुणालाही न सांगता घरात न सांगता निघून गेला आहे. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता तो आढळून न आल्याने त्याचा भाऊ अशोक दळवी यांनी तो हरविल्याची सुरगाणा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याची उंची १६५ से.मी असून रंग सावळा, शरीरयष्टी तडपातळ आहे. त्याने सफेद फुलबाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. त्याला मराठी, कोकणी भाषा येतात. या वर्णनाचा व्यक्ति आढळल्यास सुरगाणा पोलिसांशी ०२५९५-२२३३३३ / ९४२०९०४२६९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.


