कळवण तालुक्यातील खडकी गावात गेल्या काही काळापासून अवैध मटका पिढी व जुगार व्यवसाय खुलेआम सुरू असून त्यामुळे आदिवासी भागातील अनेक तरुण दिशाभूल होत आहेत. कुटुंबांचे उध्वस्तीकरण सुरू असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकांना व्यवसाय बंद करण्यासाठी लेखी अर्ज दिला आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नुकत्याच केलेल्या कारवाईंना छेद देत अवैध धंदे पुन्हा डोके वर काढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. अभोणा पोलीस स्टेशन व कळवण उपविभागीय कार्यालय असतानाही हे धंदे कसे सुरू राहतात, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
अवैध मटका-जुगारामुळे अनेक तरुण, बेरोजगार व शेतकरी जलद पैशाच्या अमीषाला बळी पडत आहेत. प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी भीती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.